वाटसरु……..

कभी ज़िंदगी एक पल में गुज़र जाती है
कभी ज़िंदगी भर एक पल नही गुज़रता
इंद्र की ज़िंदगी में भी
एक ऐसा ही पल रुक गया था
जिसे वो आरती के नाम से पेह्चान सकता था
रात गुज़र रही थी,
लेकिन वो एक पल
सारी रात पर भारी था
जाने क्या सोच कर नही गुज़रा, एक पल रात भर नही गुज़रा

जाने क्या सोच कर नही गुज़रा
एक पल रात भर नही गुज़रा

अपनी तन्हाई का
औरो से ना शिकवा करना
तुम अकेले ही नही हो
सभी अकेले हैं
येह अकेला सफ़र नही गुज़रा
जाने क्या सोच कर नही गुज़रा

दो घड़ी जीने की मोहलत
तो मिली है सबको
तुम भी मिल जाओ
घड़ी भर को
येह गम होता है
एक घड़ी का सफ़र नही गुज़रा
जाने क्या सोच कर नही गुज़रा

जाने क्या सोच कर नही गुज़रा
एक पल रात भर नही गुज़रा

गुलजार

Advertisements

ह्या कवितेची स्फुर्ती मला माझ्या एका मैत्रिणीची कविता वाचतांना मिळाली.

त्यामुळे या कवितेचे संपुर्ण श्रेय केवळ तिच्या कवितेला आहे

 

मन मोकळे अवकाश

त्यात गुलाबी पहाट

डोळे थकुनीया गेले

तुझी पाहुन मी वाट

मन पाखरु पाखरु

उडे वारयाच्या वेगात

नाही उसंत अश्रुंना

जरी दु:ख ह्रुदयात

मन शेतातली माती

कोणी नांगरी विश्वासाने

बीज पेरले फ़ुलांचे

प्रेम बहरुनी आले

मन वादळाची रात्र

ह्रुदय झाले ओलेचिंब

जसा सरला अंधार

दिसे तुझे प्रतिबिंब

मन करे व्यवहार

नसे त्यात कधी तोटा

हारुन ते देखील

मिळे दुसरे बदल्यात

तुझे अप्राप्य होणे अटळ असते कुठल्याही क्षणी

म्हणून म्हणत असतो

रडून घ्यावे तुझ्या कुशीत भरभरुन

फ़िरु द्यावेत तुझे

चांदणे माखलेले हात

माझ्या भाळावरुन

आणि शोषुन घ्यावी

तुझ्या डोळ्यातली माया

हे सारे आयुष्यभर पुरणारे नसते

पण उदासवाण्या क्षणीतरी

अश्रु आवरतांना

तुझी सोबत हवीहवीशी वाटते..

पल्लवी….कॉलेजमधील एक घोंगावणारे वादळ माझ्या आयुष्यात एक थंड हवेची झुळुक बनुन कसे आले हे मला अजुनही न उलगडलेले कोडे आहे..पण या झुळुकेने आयुष्याला कलटणी जी दिली ती मात्र एखादे चक्रीवादळ सुध्धा देणार नाही.

आमची पहिली भेट HOD च्या ऑफिसमध्ये झाली..झाली कसली ती करवली ती सुध्धा HOD ने. कारण काय तर आम्ही दोघांनी नोटिसबोर्ड वाचुन वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज केला होता.त्या दिवशी प्रथम मला ती हिटलरची सुधारीत आवृत्ती भासली परंतु तो सुरवतीचा भासच ठरला. 

तीचा भुतकाळ बघता तीच्या बरोबर वादविवाद स्पर्धेमध्ये भाग म्हणजे मला सन्मानच होता कारण या मॅडम त्यांच्या शाळेच्या मंत्रीमंडळात होत्या, विद्यार्थी समितीच्या अध्यक्षा, भरीस रानडे स्मृती वादविवाद स्पर्धेमध्ये प्रथम म्हणजे सचिन तेंडुलकर बरोबर शालेय टीम मधला अकरावा खेळाडु Direct World cup Final ला ओपनिंग !!

 

पण पहिल्यापासुन पल्लवीने सर्व जबाबदारी आपल्याकडे घेतली including माझी .मुद्देसुद बोलणे, सर्व गोष्टींची नोंद करणे , संयमीत आक्रमकता ईत्यादी गोष्टीं बघता प्रथमत: ती मीन राशीची आहे यावर माझा विश्वासच बसला नाही.मला तर माझ्या पुढे मुर्तीमंत सिंह रास दिसत होती. कालंतराने कळाले की तिचा भाऊ ज्योतीष विषारद आहे मग आपल्याकडे बढाईचा हा मुद्दा पण गेला.

अश्या सर्व गोष्टींमधुन आमची तयारी चालु झाली. 

कॉलेजमध्ये मुलींचा व मुलांचा वर्ग वेगळा असल्याने तयारीचे co-ordination करायची जबाबदारी मी तिच्या वरच सोपावली.(नेहमीची सवय कामास आली ) आणि तिने त्याचा व्यवस्थीत पाठपुरावा करण्यास चोख सुरुवात केली. एरवी शांत असलेली जर कोणी डिवचले तर मात्र रणचंडीका व्हायला वेळ लगायचा नाही. एकदा आमचे लेक्चर चालु असतांना ही मला बोलवायला आली सर जरा खवळलेले होते त्यामुळे आणी लेक्चर मध्ये खंड पडल्यामुळे ते आणखीनच भडकले. म्हणाले काय फ़िरायला जायचे आहे काय ?” झाले माता खवळली म्हणाली होय जरा गाडीची चावी देता का तुमची ? लवकर येऊ मग “….सगळा क्लास सरांना विसरुन खदाखदा हसला.पण ईतक्या काळात पल्लवी माझ्यावर चिडलेली मला तरी आठवत नाही. पण हिच्या वागण्याने माझी नेहमीच पंचाईत व्हायची.

अशीच एकदा श्रावणात सत्यनारायणाची पुजा होती माझ्या घरी (दर श्रावणात घालतो बरं का आम्ही !….ईति पुणेरी). बरेच पाहुणे मंडळी घरी होती , पुजा झाल्यावर पल्लवीने माझ्या आईला वाकुन नमस्कार केला आणी म्हणाली येते हं आई !”…ईकडे माझे आईवडील व सगळे नातेवाईक गारएकदम Statue ! मग धक्यातुन सावरल्यावर आई लगेच म्हणाली अगं थांब पहिल्यांदाच आली आहेस अशी कशी जाशील ?” मग आईने आत जाउन एक Dress material आणले आता गार व्हायची पाळी पल्लवी आणी माझी !

सगळे गेल्यावर आई म्हणाली गोड आहे मुलगी.” तीची समजुत काढता काढता माझे नाकेनाउ आले.काय करणार मणींदरसिंगने मार्शलला bouncer वर Six मारल्यावर काय होणार दोघेही surprise वेगवेगळ्या कारणांमुळे !

आमची तयारी नियामीत चालु होती.आम्ही रोज कॉलेजमध्ये जागा नसल्याने हिरवळ अथवा कॉलेजसमोरील कॅन्टीनमध्ये भेटुन तयारी करत असु.कॉलेज पुरातन आणी coeducation नसल्याने सगळी कडे याची चर्चा चालु झाली व याचा संदर्भ मी दिला त्यावेळी ती म्हणाली तुला काही त्रास नाही ना मग झाले आणी त्रास झाला तर मला सांग मी बघते त्यांच्याकडे….मी कधी डॉनला पाहीले नाही पण तीला ईतर लोक का घाबरतात याचा अंदाज मला चांगलाच आला.

सरतेशेवटी आमचा स्पर्धेसाठी जायचा दिवस आला.नेहमी प्रमाणे आर्थिक ताळेबंद तिच्याकडेच होता आणी मी तिला आधीच कल्पना दिली असल्याने ती निश्चिंत होती (की मी भाजी पोळी खात नाही म्हणुन!).स्पर्धेच्या गावी पोचल्यावर मला माहीती मिळाली कि हिचा मामा ह्याच गावात रहातो त्यामुळे त्यांना भेट देणे compulsary आहे.पण माझ्या सुदैवाने ती एकटीच भेट देउन यायला तयार झाली.प्राथमिक फेरी झाल्यावर पल्लवी मला म्हणाली मी मामा कडेजाउन येते तु ईथेच थांब आपण एकत्र जेऊ मी आल्यावर ok?”

मी पण म्हणालॊ निश्चिंत होऊन जा आरामात ये मी ईथेच थांबतो तु येइपर्यत.ही वेळ होती सकाळी ११.३० ची.दुपारी १ वाजता बाकी झालेले मित्र जेवायला बोलवायला आले.मी म्हणालो पल्लवी येत आहे तुम्ही जेउन घ्या.मी तिची वाट बघत आहे i promised her i will be here till she come.मी हॉल बाहेरच्या पायरयावर तीची वाट पहात बसलो१ चे २ झाले २ चे ४ आणी बघता बघता रात्रीचे ८ देखिल वाजले मी तिथेच ! .१५ ला रिक्शामधुन पलवि उतरली म्हणाली काय रे ईथे काय करत आहेस पायरीवर ? मुशयरा चालु झाला असेल गेला नाहीस? “.मी उत्तरलो तुच सांगितलेस ना की आपण एकत्र जेउ म्हणुन ? या पायरीवर बसायला सांगुन गेलीस तेव्हा पासुन वाट बघत आहे“.हे ऎकुन चकीत झालेली पल्लवी म्हणाली म्हणजे आजुन तु दुपारपासुन ईथेच बसला आहेस?” बाजुला बसलेले २ मित्र म्हणाले किती समजवले चल जेवयला म्हणुन पण साहेब ऎकतात थोडिच सकाळ पासुन बसले आहेत.” पल्लवी घाईघाईने म्हणाली चल आधी होटेलला तिथे बोलु .जवळच्या होटेलमध्ये गेल्यावर ऑर्डरदेउन झाल्यावर तिच्या डोळ्यातुन धारा चालु झाल्या का?” आता तिला कसे समजवावे हे न कळुन मी उत्तरलो “A promise is a promise but promise to friend is double promise” असे आसल्यावर मी एकटा कसा जेऊ? थोडा वेळ आम्ही दोघेही गप्प होतो काय बोलावे हे न समजुन ती आणी मला भूक लागली असल्याने मीमग तिच म्हणाली तुला डोसा ईतका आवडतो का? मी म्हणालो याच्या पेक्षा वडापाव खूप जास्त आवडतो पण खूप वडे खाल्लेतर बील खूप येइलमग ती हसुन म्हणाली मग मी हा डोसा खाउ का ईकडच्या साईड्ने? मी तो पर्यत कधीच डोसा share नव्हता केलेला अगदी आईबरोबर सुध्धा.पण i dont know what happened and i said “ओके चालेल पण थोडाच खा हं! सिरीअसली” .ईकडे आम्ही जेवत असतांना पलीकडच्या टेबलवर चार टारगट पोरे बसली होती त्यांची टवाळकी थोडावेळ दुर्लक्षीत केल्यावर पल्लवी जागेवरुन उठली मी तिला थांबवत म्हणालो अगं जाउदे ते टवाळकी करणारचयावर ती थांबलीसुद्धा नाही.त्यांच्या जवळ जाउन म्हणाली काय रे काय म्हणालास परत बोल बरे! तंगडे तोडुन हातात नाही दिले तर नाव नाही लावणार पल्लवी“.असा रणचंडीकेचा अवतार पाहुन ती पोरे घाबरली आणी होटेल मालकाने हाकलण्याआत निघुन गेली.

तिचा आवेश पाहुन कोणीही doubt घेतला नसता की तिने त्याचे तंगडे मोडले नसते म्हणुन! ती परत आल्यावर मी मात्र उगाच माझे पाय आवरुन बसलो ! 🙂

२ दिवस स्पर्धेच्या ठीकाणी घालवल्यावर (Result वरुन पल्लवीने परीक्षकांशी घातलेला वाद ,निदर्शने ईत्यादी प्रकार सोडुन )आम्ही परत आलो.आता आमचा official कामचा आवका संपला होता परंतु य दरम्यान आम्ही दोघे चांगले मित्र झालो होतो त्यामुळे अधुन मधुन डबा खायला भेटतच राहिलो.तिच्याशी बोललो नसेल तर मला काही तरी चुकल्यासारखे वाटे आणी मी बोललो नाही तर तीला.

कॉलेजसमोरील कॅन्टीन आमचा अड्डा बनला होता.कॉलेज संपल्यावर दुपारी गप्पा टाकल्या शिवाय घरी जाणेच व्हायचे नाही.

मला ती आवडायला लागली होती.पुढचा सगळा विचार करुन निर्णय घ्यायचे ते दिवस नव्हते.फक्त बारावी होऊन BE ला admission

चालू होत्या आणी न्यायालयाने प्रवेश लांबवल्याने आम्ही या कॉलेजमध्ये होतो ही वस्तुस्थिती होती.तरी तिला हे सांगण्याचा मी निश्चय केला.

एका अशाच दुपारी कॅन्टीनमध्ये झोपाळयावर (हो झोपाळा !!) बसुन वडापाव खातांना मी खडा टाकला मला आपल्या कॉलेजमधील एक मुलगी खूप आवडतेऎकुन पल्लवी उडालीच कधी पासुन? कोण ?” एत्यादी सतरा प्रश्न.मी पण सांगीतले आहे एक खूप आवडते पण तिला सांगायला daring नाय.ती म्हणाली त्यात काय घाबरायचे? नकाराला घाबरतोस का?” मी म्हणालो नाही विचारयचीच daring नाय काय करु ? experience नाही” “प्रेमात experience नाही सच्चेपणा लागतो तुला काहीही मदत पाहीजे असेल तर सांग“.मग तिने मला कसे विचारायचे ते सांगीतले म्हणाली एकदा practice kar त्याप्रमाणे मी तिच्या बरोबर एकदा रंगीत तालिम सुद्धा केली.ते झाल्यावर ती म्हणाली एकदम बेस्ट!! आता मुहुर्त काढ आणी विचार.मी म्हणालो आजचा मुहुर्त कसा आहे त्यावर ती म्हणाली शुभस्य: शीघ्रम. मग मी सर्व धीर एकवटुन विचारले आत्ता ईतक्या वेळा विचारले आजुन हे रिपीट करु का?” न समजुन तिने विचारले म्हणजे?” “पल्लवी ती दुसरी कोणी नसुन तुच आहेस“.ईतका वेळ हसरी असणारी पल्लवी एकदम गंभीर झाली तु गंमत तर नाही करत ना?”. या प्रश्नावर मी पुढची १० मिनटे तिला समजवले कि या सर्व प्रकाराबद्दल sorry पण हे सर्व खरे आहे.”आपण या वर उद्या बोलु असे सांगुन तिने तिच्या स्कुटरला किक मारली आणी नेहमीच्या सुसाट वेगाने ती दिसेनाशी झाली. मी आता सर्व संपले असे समजुन देवदासच्या अवस्थेत गेलो.तो दिवस बाकि कसा गेला मला कळालेच नाही.रात्रीभर स्वप्नात देखिल मी तिच्या कडुन भरपुर थोबडीत खाल्या.दुसरया दिवशी कॉलेजला जावे की नाही या विचारात गेलोच नाही दिवसभर तळजाईच्या टेकडीवर घालवल्यावर संध्याकाळी घरी परतलो.आल्या आल्या आईने विचारले काय झाले? कॉलेजला का नाही गेलास ? मी तिला उलट विचारले तळजाईला कोण गेले होते की त्यांनी तुला सांगितले ? मग कळाले की पल्लवीने फोन केला होता की मी कॉलेजला का नाही आलो !!.next day

कॉलेजला पोचल्या पोचल्या पल्लवी भेटली चल कॅन्टीनमध्येमला वाटले कॉलेजला मार खाल्यापेक्षा कॅन्टीनमध्ये मध्ये खाल्लेला बरा ! लोक कमी असतात ! कॅन्टीनमध्ये गेल्यावर विचारले काल कुठे होतास? “तळजाई !” मी उत्तरलो तु कधी पासुन देवळात जायला लागलास ?” माझे उत्तर तळजाईला भूत बंगला सुद्धा आहे .”मग तिने बोलायला सुरुवात केली त्यानंतर ती अर्धा तास बोलत होती त्यातले मला काही आठवत नाही मला फक्त तिचे पहिले वाक्य ऎकु आले मला पण तु आवड्तोस “.

हवेत तरंगणे म्हणजे काय याचा मी अनुभव पुढील बराच काळ घेतला.

काही दिवसांनी खाली आल्यावर तीने मला समजावले बघ आजुन आपण खूप लहान आहोत.तु मला आणी मी तुला आवडत जरी असु तरी पुढील निर्णय घ्यायला आपण वेळ द्यायला पाहिजे मला पण करीयर करायचे आहे आणी तुला पण“.माझी admission झाली की मी दुसरया कॉलेजला जाईल तु दुसरया कॉलेजला ! या वर माझ्या कडे एक उपाय आहे जर हे प्रेम खरे असेल तर आपण ४ वर्षे आपले शिक्षण पुर्ण करु आणी हे आकर्षण असेल तर तसेही आपण एकमेकांना विसरु पण जर खरे प्रेम असेल तर याच ठिकाणी याच दिवशी आपण भेटुया या काळात आपण फोन अथवा भेटायचे नाही. नविन कॉलेजला जाई पर्यंत आपण एकमेकांना भेटु पण after that no.Is it ok with you?.माझ्यासमोर यक्षप्रश्न होता पल्लवी जे म्हणत होती त्यात तथ्य देखिल होते.थोड्यावेळाने मी तिचा पर्याय स्विकारला.काही दिवसांनी तिची admission होऊन ती वेगळ्या आणी मी वेगळ्या कॉलेजला गेलो.

काही दिवस त्रास झाला पण नंतर मी कॉलेजला रुळलो.पाखरांसारखी वर्षे उडुन गेली.जुनी calenders sort करतांना मला एक तारीख दिसली खूप विचार केल्यावर आठवले i done promise to meet someone! ती तारीख एक महिन्यानंतर होती पण मी तयार नव्हतो. जाणते अजाणतेपणी मी वचन पाळले होते परंतु पुर्तता करण्यास मन धजावत नव्हते.उपाय सोपा होता जायचेच नाही दुसरयाला उत्तर उमजेल आणी जिवन परत एकदा आपल्या मार्गाने पुढे जाईल.तो पर्यंत हे उमजले होते की संपर्क नसेल तर आकर्षण काय पण खरे प्रेम देखिल कमी होऊ लागते इथे तर ४ वर्षे काळ गेला होता.मनात एका प्रकारे अपराधी भावना होती की आपण हे सर्व कसे विसरलो आणी दुसरीकडे बरे वाटत होते की पल्लवी बरोबर होती .

जसजसा दिवस जवळ येउ लागला तसा मी निर्णय घेतला आपण जायचे पण काहीतरी बतावणी करायची.त्याची तयारी देखील केली.माझ्या एका जवळच्या मैत्रिणीस सर्व प्रकार सांगुन तिच्या मतानुसार हे सांगायचे ठरले की सीमा माझी girlfriend आहे.ठरल्यानुसार मी पल्लवीचा फोन लावला आणी दुसरया दिवशी भेटायचे ठरले.

होटेलमध्ये ठरल्याप्रमाणे भेटल्यावर सहाजीकच सीमा कोण हे प्रश्नचिन्ह तिच्या चेहरयावर स्पष्ट दिसत होते.सुरुवातीचे हाय हॅलो वगैरे झाल्यावर तिचा पहिला प्रश्न होता..”तुला आजुन ते सगळे दिवस आठवतात ?” मी जरा गडबडुन विचारले हो, का?” ती म्हणाली असेच विचरले, तुला सगळ्या अटी पण आठवत असतील, पण तुला कधी माझी आठवण नाही आली? तुला अटी पाळण्यात आनंद होता का मला न भेटल्याचे दु:ख जास्त होते ?” काहीच कल्पना नसल्याने मी पुरता भांबाऊन गेलो होतो.तिथे सीमाने सांभाळुन घेतले.ती म्हणली एक मिनीट, तुला काय म्हणावयाचे आहे ?”.पल्लवी म्हणाली या ईतक्या वर्षात जर खरच तुला ओढ वाटली असती तर या अटी पाळायच्या भानगडीत तु पडला नसतास.”

मी सर्व धीर एकवटुन म्हणालो बरोबर आहे तुझे,खरे सांगायचे तर या सगळ्या वर्षानी परीक्षा पाहीली आणी त्यात मी नापास देखील झालो.सीमा माझी girl friend आहे आणी आम्ही एकमेकांत गुंतलो आहोत.ते खरोखरच आकर्षण होते वय म्हणा वा परिस्थीती“.हे ऎकुन ती म्हणाली मग फोन का केलास भेटलो नसतो तरी चालले असते“.”आपण चांगले मित्र आहोत पल्लवी ,मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या तर गैरसमज दुर करायचे होते“.मला कळत होते की मी खोटे बोलुन गैरसमज तयार करत होतो दुर नव्हतो करत.पण माझा नाईलाज होता कारण मला माहीत होते कि जर प्रेम नसेल तर ते दोघांना त्रासदायक ठरणार होते.पल्लवी हसुन म्हणाली “good nice to hear that,Best luck for you both”.असे म्हणतांना सीमा पासुन तिच्या डोळ्यातील ओलावा लपवण्यात पल्लवी यशस्वी झाली तरी माझ्या पासुन तो नक्कीच लपला नाही.मला माझी चूक कळुन चुकली होती परंतु कळुन देखील न कळल्यासारखे मी करत होतो.कोणाचा विश्वास मी मोडला होता जाणुनबुजुन,जाणते पणी.

आम्ही तेथुन बाहेर पडल्यावर ती मला परत कधीच दिसली नाही की तिचा फोन आला नाही अन मी ही कधी केला नाही.परतल्यावर सीमा म्हणाली तिचे खरोखरच तुझ्यावर प्रेम होते,तिच्या डोळ्यात दिसत होते.तु असे का केलेस?” मला आठवत होते तिच्या डोळ्यातले बाहेर न आलेले अश्रु आणी तिचे प्रश्न !I learnt a big difference between attraction and love from her but at what cost ?or was it at her cost?

This post is dedicated to her memories which i spent with her and will always remain part of my life.

mj

 

 

 

 

 

सकाळी सकाळी सहा वाजता TV वर बातमी ऎकली की किंग ऑफ पॉप मायकल जॅकसन नो मोअर….क्षणभर सर्व थांबल्यासारखे झाले.

इतकी वर्षे ज्याच्या संगीताने , नॄत्याने जगभरतल्या संगीतप्रेमींना अक्षरशः वेडं केले तो MJ आता नाही हि कल्पनासुध्धा करवत नाही.

माझ्यापुरते सांगायचे तर माझी आंग्ल गाण्यांची ओळखचं मुळी MJ ने झाली.कधीतरी कॅम्पमध्ये गेलो असता sound of music स्टोअरमध्ये त्याचे Thriller ऎकले आणी मती गुंग झाली गाण्याचे शब्द कळाले नाही पण गाण्याचा ठेका काळजाचा ठोका चुकवुन गेला….

कोणी असे पण गाऊ शकते का ?

या विचारात घरी आलो ….घरी अनुभव सांगीतला तर म्हणाले कि कॅम्पतली उनाड पोरे पोरी असलेच काहीबाही ऎकत असतात…..त्याकाळी कॅम्प ही वायागेलेल्या लोकांची जागा समजली जायची ( असा समज होण्यास कारणेही तशीच होती)…नंतर महविद्यालयीन शिक्षणास सुरुवात झाली आणि त्या वातावरणात माझी ओळख झाली नी MJ नामक वादळाशी….असे वादळ की जे आले आणि सर्वांना झपाटुन टाकले…सर्वांची पाऊले थीरकु लागली MJ च्या तालावर….२० वर्षे हे वादळ चालु होते माझ्या आयुष्यात कालांतराने Rock ची गोडी लागली आणिक पॉपमध्ये MJ च्या तोडीचे कोणी न ऊगवल्याने पाऊले वळाली ती Deep Purple ani Pink Floyd कडे…तरी मनाचा ऎक कोपरा कायम MJ साठी राखीव राहीला आणि कायम राहील…

तो आला त्याने गाईले आणि त्याने जिंकले…….असे त्याच्या बद्दल सांगता येईल….त्याला आयुष्यात सर्व काही मिळाले पैसा,प्रसिद्धी,मान, ईतकेच काय त्याने अनेक निषेध,शिव्या इत्यादी देखिल पचवले…कारणेही तशीच होती पण गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलु नये….१०० वर्षाच्या आयुष्यात जे कोणाला जमणार नाही ते त्याने ५० वर्षात साध्य करुन दाखवले…त्याला माझ्या कडुन सलाम…..वाईट इतकेच वाटते कि ईतके सर्व काही मिळवुन एका गोष्टीपासुन तो वंचीत राहिला तो म्हणजे चान्स टु से गूड्बाय टु हिज फ़ॅन्स…

..you missed it MJ and we will always miss you!!!…..

Now यापुढे माझीतरी ऎकच ईच्छा राहील परमेश्वराजवळ कि काहीही होऊदे पण जाण्याआधी ज्यांचा ऋणी आहे त्यांचा तरी गुडबाय / निरोप घेण्याची संधी मिळो हि माझी सर्वोच्य आकांशा/ ईच्छा असेल….

Dasvidaniya MJ…

अर्धा वाटा अर्धांगीला….

 

काल सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचता वाचता माझी नजर एका महत्त्वाच्या बातमीकडे गेले.

सरकारचा महत्त्वाचा निर्णय….”या पुढे पतीच्या संपत्तीत पत्नीचा अर्धा वाटा “…..

 अरे महान (का बुद्धीने लहान!!) लोकांनो हा विचार पुर्वीपासुन चालत आला आहे (चालणे हा ईथे बोली भाषेतला अर्थ घेतला आहे)…म्हणुन तर पत्नीला अर्धांगी म्हणतातती तुमचे सर्वस्व वाटुन घेते आणि तिचे तुमच्या बरोबर वाटुन घेते (असे करणे पुर्वी अपेक्षित होतेसध्या काही कारणास्तव शक्य होत नाहीही कारणे आपण नंतर चर्चेस घेउ..)…तर एकंदर हा विषयच स्फोटक,विवादास्पद,नाजुक व अनेक भावनांशी निगडीत (म्हणजे जोडलेलापिंपरीचिंचवडचे निगडी नव्हे!!) असल्याने त्याची विस्तॄत कारणमिमांसा करणे जरुरीचे आहे.

 मुद्दे (किंवा गुद्दे!) :-

 पत्नीचे विचार/मुद्दे

.घरामध्ये अधिक अधिकार त्यामुळे स्वाभावीकच अधिक स्वातंत्र्य

.अर्थिक / मानसीक सुरक्षा

.पतीनंतर (घटस्फोटीत / विधवा) आयुष्याची घडी बसवण्यास सहाय्यता

.पतीच्या बेलगाम वागण्यास लगाम घालण्याचे साधन (छडी!!).

 ५.जर घर पत्नीच्या नावावर असेल तर त्यावर नवरा हक्क सांगेल का??

 
पतीचे विचार/मुद्दे   

.हे बायकोचे भांडणाचे नविन शस्त्र होणार कि काय ?

२.अवाजवी मागण्या पुर्ण करण्यासाठी काही सुना जसे हुंडाविरोधी कायद्याचा वापर करतात तसा याचा पण…?

३.जर तात्विक मतभेदावरुन घट्स्फोटापर्यंत प्रकरण गेले तर घर देखिल जाणार काय?

४.जर घर पत्नीच्या नावावर असेल तर त्यावर नवरयाचा हक्क किती????

५.संपत्तीसाठी बायकांनी ३-४ लग्ने केली तर सगळ्यांची घरे अर्धी मिळणार??

असे अनेक मुद्दे दोन्ही बाजुंनी उभे रहातात त्यामुळे कायदा करण्याआधी सरकारने त्यांचा आणी पळवाटांचा सुद्धा विचार करावा आणि त्यात पारर्दशकता आणावी…(कायदा कितीही उत्तम असला तरीही कायदेपंडीत त्यातुन पळवटा ह्या काढणारच….या पळवाटा ते चांगल्या कारणासाठी का नाही शोधुन काढत…..चांगले आणि वाईट हे आपण कुठल्याबाजुने बघतो त्यावर अवलंबुन असल्याने ते काय यावर चर्चाकरणे हे या लिखाणाचे उद्दीष्ठ नाही….

तरी कायदा हा करावाच पण तो करतांना १०० लांडग्यांबरोबर १० मेंढरे मरणार नाहीत हे महत्वाचे नाहीतर कालंतराने समीकरण १० लांडगे आणि १०० मेंढरे असे होईल……

क्रमशः

 
 
 
 
 

 

Visitors

मराठी ब्लॉग विश्व

मराठी मंडळी

Marathi Mandali!

Indiblogger

buzzerhut

Promote Your Blog
Advertisements